Ad will apear here
Next
१०१ ब्रेकफास्ट रेसिपीज् + १०१ बेबी फूड रेसिपीज्
रोज उठून ब्रेकफास्टला काय करायचे, हा कोणत्याही घरात पडणारा प्रश्न. कांचन बापट यांनी मात्र, आपली या प्रश्नातून सोडवणूक केली आहे. वर्षभर पुरतील अशा ब्रेकफास्टच्या पाककृती त्यांनी या पुस्तकात दिल्या आहेत. त्याही पौष्टीक. विविध प्रकारचे पराठे, धिरडी, सँडविचेस, उत्तप्पा, ढोकळा, पोहे, शिरा, दल, मुठिया अशा पदार्थाबरोबरच पास्ता, केक, मफिन्स असे पाशात्य पदार्थ करायलाही शिकवले आहे.

कांचन बापट यांचे दुसरे पुस्तक सहा महिने ते पाच वर्षापर्यंतच्या मुलांसाठी पौष्टिक पदार्थांचे आहे. या पुस्तकात त्यांनी वयानुसार भाग केले आहेत. सहा महिने ते एक वर्ष या विभागात तांदूळ, मुगडाळ, गजर, टोमॅटो, नाचणी, ओट्स, सातू यांपासून बनवलेले पदार्थ. एक ते दोन वर्ष वयाच्या मुलांना भाताचे प्रकार, वेगवेगळ्या खिरी, सांजा पॅनकेक. दोन ते तीन वर्ष वयाच्या मुलांसाठी अंडी, पराठ्याचे प्रकार आणि तीन ते पाच वर्ष वयाच्या मुलांसाठी पास्ता, टिक्का, भाजी, इडली, डोसा हे पदार्थ करायला शिकवले आहेत.

प्रकाशक : मेनका प्रकाशन
पाने : १३२
किंमत : १९९ रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZOVBM
Similar Posts
मुलांच्या डब्यासाठी ४०४ पौष्टिक रेसिपीज वेगवेगळे खाण्याची हौस केवळ मोठ्यांना असते, तशी मुलांनाही असते. मुलांच्या वाढत्या वयात त्यांना वेगवेगळे पदार्थ खायला देताना त्यातून त्यांना उरेल अशी ऊर्जा मिळेल आणि एकूणच आरोग्यासाठी ते पोषक असेल, याकडे लक्ष द्यायला हवे. कांचन बापट यांनी या पुस्तकात मुलांना आवडतील अशा पौष्टिक पदार्थांच्या पाककृती सांगितल्या आहेत
मुलांच्या आवडीच्या ३०३ चविष्ट रेसिपीज पारंपरिक पदार्थांबरोबरच चुरचुरीत सिझलर्स, पिझ्झा, पास्ता एवढेच नव्हे, तर वॉफल्स, पुडिंग्स, मफिन्स घरच्या घरी बनवता आले तर किती बहार येईल. कांचन बापट यांनी या पुस्तकात हे पदार्थ घरच्या घरी करण्यासाठी पाककृती दिल्या आहेत.
संपूर्ण शाकाहारी सुरुची आयुष्यभराचा सोबती असे या पुस्तकाचे वर्णन करायला हरकत नाही. कारण इंदिरा परचुरे यांनी १४०० हून अधिक पारंपरिक व आधुनिक पाककृती या पुस्तकात दिल्या आहेत.
सांस्कृतिक भारत- भारतीय राज्यांची संक्षिप्त ओळख भारताची संस्कृती काही पानांत सामावणे अवघडच. या संस्कृतीची तोंडओळख करून देण्याचे काम सांस्कृतिक भारत हे डॉ. सुधीर देवरे यांचे पुस्तक करते. यात देशातील सर्व राज्ये, तेथील भाषा, लोकसंख्या, विभाग आदींची माहिती आहे. विशेषतः ईशान्येकडील राज्ये, तेथील जाती-जमाती आणि प्रमुख बोलीभाषा यांची सविस्तर माहिती पुस्तकात मिळते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language